Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

पिंपरी | बापूसाहेब गोरे |

अधिकारी “करणीला” उतरल्यावर काहीही करू शकतात याचा प्रत्यय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविलेल्या भंगार च्या टेंडर प्रक्रियेत दिसून आला असून “भंगारगिरी” करणाऱ्या अधिकाऱ्याची पालिकेत सर्वत्र चर्चा सुरू आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आकाश चिन्ह विभागातील अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे पिंपरी चिंचवड शहर बेकायदा होर्डिंगचे शहर बनले. अनेक चौका-चौकात वेडीवाकडी होर्डिंग उभे राहिले.हे अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी पिंपरी महापालिकेच्या वतीने 8 डिसेंबर 2020 रोजी टेंडर प्रकाशित केले.टेंडर घेणाऱ्या एजन्सीने अनधिकृत होर्डिंग स्वखर्चाने तोडून मिळालेले भंगार (स्क्रॅप) विकून मिळालेले पैसे महापालिकेला जमा करणे.जी एजन्सी जास्तीत जास्त भंगारचा दर महापालिकेला देईल त्याला काम देण्यात येणार अशा प्रकारचे हे टेंडर होते. 29 डिसेंबरपर्यंतच्या टेंडरच्या मुदतीमध्ये 7 एजन्सीनी सहभाग नोंदविला.

टेंडरमध्ये महापालिका क्षेत्रात होर्डिंग एजन्सी अथवा जाहिरात एजन्सी असणाऱ्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी सहभागी होऊ नये ही महत्वाची अट होती.

टेंडरमध्ये सहभागी झालेल्या एजन्सी टेंडर ओपन होण्याची वाट पाहत होते मात्र पिंपरी महापालिका प्रशासनाने अचानक कसलेही कारण न देता अनधिकृत होर्डिंग काढण्याचे टेंडर रद्द केले आहे.
या प्रकरणात पिंपरी महापालिकेच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने “चालबाजी” केली असून भंगारच्या टेंडरमध्ये “भंगारगिरी” केली असून त्याच्या मर्जीतील एजन्सी ला टेंडरमध्ये सहभागी करून घेण्यासाठी 21 दिवस राबविलेली टेंडर प्रक्रिया अचानक रद्द करून टेंडरच्या अटी शिथिल करून पुन्हा टेंडर काढण्याचे नाटक केले जाणार असल्याचे बोलले जात आहे,यामुळे महापालिकेचे मोठे नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे. पिंपरी महापालिकेचे नुकसान करणाऱ्या “चालबाज”अधिकाऱ्याच्या या कृत्याबद्दल शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे.