Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

चिंचवड- (प्रतिनिधी)
चिंचवडगाव ‘प्रभाग 18’ मधे सध्या हेरिटेज प्रकल्पा अंतर्गत सिमेंट रस्ते,नविन ड्रेनेज लाईन,स्ट्राॅम वाॅटर लाईन व पाणी पुरवठा विभागांची कामे सुरु असून नागरिकांना रस्त्याने चालणेही मुस्किल झाले आहे त्यामुळे अगोदर रस्त्याची कामे पूर्ण करा व नंतरच चिंचवड गावठाणात “पे अँड पार्क”सुरू करा अशी मागणी नगरसदस्य मोरेश्वर शेडगे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

रस्ते,पाणीपुरवठा व ड्रेनेज पाईप लाईन या सर्व कामांसाठी चिंचवड गावठाणातील सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत रस्त्यांची खोदाई काम सुरु असताना जेसीबी कडून अनेक वेळा पाण्याच्या पाईप लाईन, ड्रेनेज लाईन,विजेच्या लाईन तुटने हे प्रकार वारंवार घडतात शिवाय रस्त्यांच्या खोदाईमुळे नागरिकांना चालता येणे सुद्धा कठीण बनले आहे. त्यामुळे चिंचवड गावठाणातील वयोवृद्ध,महिला व नागरिक हैरान व हवालदिल झाले आहेत त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी पिंपरी महापालिकेने ही कामे युद्ध पातळीवर करावीत अशी मागणी नगरसदस्य मोरेश्वर शेडगे यांनी मागणी पत्रात पिंपरी महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

नगरसदस्य मोरेश्वर शेडगे यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की सिमेंट रस्ते हेरिटेज प्रकल्पाच्या कामामुळे हैराण झालेल्या चिंचवड गावठाणातील नागरिकांना चापेकर चौकातील उड्डान पुलाखाली ‘पे ॲण्ड पार्क’ही जुलमी व त्रासदायक सुविधा सुरु होत असल्याने नागरिकांमधे प्रचंड रोष वाढला आहे कारण नागरिकांनी कामांवर जाता येतां यावे या करिता आपापली वाहने कामावरून घरी आल्यावर चापेकर चौकातील उड्डानपुलाखाली पार्क करावी लागतात.
कोरोना मुळे नागरिक आधीच अर्थिक विवंचनेत आहेत त्यामध्ये “पे ॲण्ड पार्क” मुळे अधिकच भर पडणार आहे.

चिंचवड गावठाणातील पुढील कामे जलदगतीने होणे गरजेचे आहेत.
१) आपण चिंचवड गावठाणातील विकास कामे जलदगतीने पूर्ण करावीत.
२) विकासकामे सुरु असताना जेसीबी कडून अनेक वेळा पाण्याच्या पाईप लाईन, ड्रेनेज लाईन, विजेच्या लाईन तुटने हे प्रकार जेव्हा घडतात त्याचवेळी प्राधान्याने ते दुरूस्त केले गेले पाहीजे.
३) जोपर्यंत चिंचवड गावठाणातील विकास कामे पुर्ण होत नाहीत तोपर्यंत मानवतेचा दृष्टीतून चिंचवड गावठाण, चापेकर उड्डाणपूलाखाली ‘पे ॲण्ड पार्क’ सुरू करु नये.
व तसे निर्देश आपण संबंधितांना द्यावेत.