Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

चिंचवड | प्रतिनिधी |

श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ चिंचवडचा राजा यांच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाचा मान अंध व्यक्तीला देऊन त्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी भोसरीचे आमदार महेश लांडगे,रा.स्व. संघाचे पश्चिम प्रांत हेमंत हरहरे,नगरसेवक मोरेश्वर शेडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने यशवंतराव चव्हाण रुग्णालयात ब्लड बँकेत काम करणाऱ्यांचा व पद्मश्री पुरस्कार विज्येते गिरीश प्रभुणे यांचा सन्मान करण्यात आला.तसेच चिंचवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांना मिठाई वाटप करण्यात आली.

मंडळाचे अध्यक्ष महेश मिरजकर,प्रमोद बरडिया,दुर्गेश मिरजकर, सचिन बारमुख, योगेश चिंचवडे,मयुर लुंकड ,शार्दुल पेंढारकर, योगेश मिरजकर, आदित्य मिरजकर यांच्या सहकार्यातुन हा उपक्रम घेण्यात आला.