Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

चिंचवड (प्रतिनिधी)

चिंचवडेनगर प्रभाग क्रमांक 17 च्या नगरसेविका करुणा चिंचवडे व सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे (रा चिंचवडेनगर,चिंचवड) यांचा मुलगा कु प्रसन्ना शेखर चिंचवडे याने रात्री 09 .15 च्या दरम्यान स्वतः गोळ्या झाडून आत्महत्या केली असून आदित्य हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता मृत घोषित केले.

भाजप नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांना दोन मुले असून मोठा मुलगा कु प्रसन्ना चिंचवडे यांचे पदवीधर शिक्षण झाले असून एक शांत, संमयी मुलगा म्हणून परिचित होता.

सौ करुणा चिंचवडे परिवाराने काल रात्री सर्वांनी एकत्र बसून जेवण केले.जेवणानंतर प्रसन्ना चिंचवडे वरच्या मजल्यावरील खोलीत जाऊन स्वतःच्या हाताने डोक्यात गोळ्या झाडून घेतल्या.उपचारासाठी जवळच्या आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केल्याची माहिती मिळत आहे.

आज सकाळी पहाटे 05.30 च्या दरम्यान काळेवाडी येथील स्मशानभूमीत अंत संस्कार करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेवक नामदेव ढाके, सचिन चिंचवडे उपस्थित होते.