Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

पिंपरी | बापूसाहेब गोरे |

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर व अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे यांच्यात गेली दोन वर्षांपासून प्रशासकीय “शीतयुद्ध”सुरू असून दोघांच्या भांडणामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका व शहराचे मोठे नुकसान झाल्याची चर्चा पिंपरी चिंचवड शहरात सुरू आहे.

आयुक्त तुम्ही शहराचे मोठे नुकसान केले-

राज्य सरकारच्या निर्णयानुसार व नवीन आकृतीबंधनुसार पिंपरी चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्त ही तीन पदे मंजूर झाली. त्यापैकी दोन पदे शासन नियुक्त व एक पद पालिका सेवेतील अधिकाऱ्यामधून निवडावे असे निर्देश असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेचे शहशहर अभियंता पदावर कार्यरत असणारे प्रवीण तुपे हे गेली अडीच वर्षांपासून प्रयत्नशील होते.
मात्र प्रवीण तुपे यांच्याशी आयुक्तांचे बिनसले असल्याने व प्रवीण तुपे केवळ डिप्लोमा धारक आहेत म्हणून तुपे यांची “डाळ” आयुकांनी शिजू दिली नाही.
अनेक प्रयत्नानंतरही तुपे यांची प्रमोशनची फाईल आयुक्तांनी बंद कपाटातून बाहेर काढलीच नाही. तुपे यांची सेवानिवृत्ती अगदी एक वर्षावर आल्याने व आयुक्त प्रमोशनचे काम करीत नाहीत हे पाहून वैतागलेल्या प्रवीण तुपे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना एक राजीनाम्याचे लेखीपत्र दिले व त्यापत्रामध्ये “आयुक्त तुम्ही पिंपरी चिंचवड शहराचे खूप मोठे नुकसान केले आहे,तसेच माझेही मोठे नुकसान केले आहे!माझ्यावर तुम्ही अन्याय केला आहे त्यामुळे मी राजीनामा देत आहे,असा प्रकारचे अनेक आरोप केलेले दबाव तंत्राचे राजीनामा पत्र आयुक्तांना दिले.राजकीय दबाव व बदनामीच्या भीतीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शेवटी प्रवीण तुपे यांचा राजीनामा मंजूर न करता जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रविण तुपे यांना पिंपरी चिंचवड महापालिकेचे तिसरे अतिरिक्त आयुक्त म्हणून प्रभारी पदभार दिला.

खूप त्रास दिलाय…!

प्रवीण तुपे हे मूळचे हडपसर येथील गाववाले.त्यांच्या ओळखीचे अनेक मंत्री,आमदार आहेत त्यामुळेच ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शहशहर अभियंता या पदावर अनेकांना मागे हटवत सहज पोहोचले.अतिरिक्त आयुक्त हे पद असेच मिळेल असे त्यांना वाटतं असतानाच आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तुपे यांचे स्वप्न भंग केले.मात्र तुपे यांनी ते मिळविलेच.तुपे हे येत्या तीन महिण्यात सेवानिवृत्त होत आहेत.मात्र सेवानिवृत्त होताना स्वतःच्या नावाचा अतिरिक्त आयुक्त म्हणून बोर्ड लावूनच निवृत्ती घायची असा कयास बांधलेल्या प्रवीण तुपे यांनी एक ऑक्टोबंर 2020 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे शारिरीक कारण देत “राजीनामा” दिला. प्रवीण तुपे यांनी आज राजीनामा देऊन 80 दिवस झाले परंतु आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांचा राजीनामा मंजूर अगर नामंजूर ही केला नाही.त्यावर कसलाच निर्णय घेतला नाही.अतिरिक्त आयुक्त आयुक्त या पदासाठी प्रवीण तुपे यांनी मला खूप त्रास दिला आहे.त्यांनाही थोडं कळू द्या इतरांना त्रास दिल्यावर काय होते ते.असे आयुक्त खाजगी बोलत आहेत. आयुक्त राजीनामा पत्रावर निर्णय घेत नाहीत त्यामुळे प्रवीण तुपे ही गेली अनेक दिवसांपासून सुट्टीवर आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अधिकारी व कर्मचारी यांचा तुटवडा आहे.गेली अनेक वर्षे नोकर भरती नाही तर दुसरीकडे प्रत्येक महिन्याला सेवानिवृत्ती घेणारांची संख्या वाढत आहे.प्रत्येक विभागात एका अधिकाऱ्यास दोन -तीन विभागाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातात.त्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत असा असंख्य तक्रारी असताना आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांचे हे “छुपे शीतयुद्ध ” पिंपरी चिंचवड कारांना नक्कीच फायद्याचे नाही.सेवानिवृत्ती अर्ज केल्यास तो 90 दिवसात मंजूर करावा लागतो असे संकेत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आयुक्तांना तुपे यांचा राजीनामा येत्या 31 डिसेंबरला मंजूर करावा लागेल.त्याऐवजी आयुक्तांनी वेळ न दवडता प्रवीण तुपे यांचा राजीनामा त्वरित मंजूर करावा व त्यांच्या जागी नवीन एका कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे.