Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  1. पिंपरी(प्रतिनिधी)
    महापालिकेच्या विविध रुग्णालयात दाखल असणा-या कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सीजनचा तुटवडा भासत आहे. यासाठी थेरगाव, भोसरी, जीजामाता आणि आकुर्डी या चार रुग्णालयांमध्ये ‘मेडिकल ऑक्सीजन जनरेटींग प्लांट’ थेट पध्दतीने खरेदी करण्यासाठी स्थायी समितीच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली.

याविषयी माहिती देताना सभापती अँड नितीन लांडगे म्हणाले की “याप्रकरणात दरपत्रकाबाबत वैद्यकीय तज्ञ समितीने 25 एप्रिलच्या बैठकीतील दिलेल्या अहवालानुसार दर कमी करुन प्राप्तचे दर स्विकृत करण्यात आले आहे. त्यानुसार थेरगाव रुग्णालयासाठी मे. ड्रग हाऊस पुणे या पुरवठादारांकडून एक युनिट साठी (1050 एलपीएम) 1 कोटी 90 लाख रुपये अधिक जीएसटी,भोसरी,आकर्डी आणि जीजामाता रुग्णालयात (960 एलपीएम) प्रत्येकी एक युनिट साठी मे. प्राईम सर्जिकल ॲड फार्मा चिंचवड या पुरवठादारांकडून एक युनिट साठी 1 कोटी 40 लाख रुपये अधिक जीएसटी इतका खर्च अपेक्षित आहे. वरील सर्व युनिट वीस दिवसात कार्यान्वित होतील, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी दिली.