Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

बापूसाहेब गोरे | पिंपरी |

औद्योगिक नगरी,कामगारांची नगरी,सांस्कृतिक नगरी असो अथवा स्वछता,आरोग्यासाठी फलदायी नगरी व अल्पशा काळात पुढारलेले शहर,असे अनेक बिरुदावली घेऊन पिंपरी चिंचवड ही नगरी राज्याबरोबर देशात नावाजली. एवढी लोकप्रियता वाढली की अनेक देश व राज्यातील लोकप्रतिनिधी अधिकारी तज्ञ पिंपरी चिंचवडचा विकास पहावयास येत होती.देशातील अनेक वर्तमानपत्र व टीव्ही चॅनेलवर पिंपरी चिंचवड शहराचे गुणगान पहावयास व ऐकावयास येत होते त्यावेळी पिंपरी चिंचवड शहरात राहणाऱ्या प्रत्येक शहरवासीयांचा उर “अभिमानाने व गर्वाने ” भरून येत होता.

लाट आली आणि पिंपरी चिंचवड शहरात विकास भकास झाला…!

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट आली आणि राज्यात व पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता बदल झाला. तेव्हापासून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विकासाला सुरुंग लागला.अनेक प्रकल्प व योजना कागदावरच रंगू लागल्या.अनेक प्रकल्प व योजना फसव्या निघाल्या.टेंडर निघत गेले,पिंपरी महापालिकेची तिजोरी रिकामी होत गेली मात्र विकास हा नावापुरताच राहिला तो भकास झाला.
महापालिकेचे कारभारी म्हणून नागपूर मार्गे पिंपरी पालिकेत रुजू झाले आणि पालिकेचा कारभार भ्रष्टाचाराने बरबटला.पालिकेचे कारभारी म्हणून ज्यांच्या हातात सत्ता ते आयुक्त श्रावण हर्डीकर हे “निव्वळ बोलके” निघाले.अनेक प्रकरणात भ्रष्टाचार समोर आल्यानंतरही मूग गिळून गप्प राहण्याची भूमिका घेतली. लोकप्रतिनिधींची मर्जी व भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण यामुळे पिंपरी महापालिकेची अनेक कारभाराची प्रकरणे कोर्टात गेली,बोगस एफडीआर सारख्याा प्रकरणात पोलीस हस्तक्षेप आला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गैरकारभाराची प्रकरणे वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भरू लागली.टीव्ही चॅनेल,सोशल मीडियावर दैनंदिन बातम्या येऊ लागल्या त्यामुळे देशात नावलौकिक पावलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेची बदनामीची लक्तरे देशाच्या वेशिवर टांगली जाऊ लागली.त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाची मान शरमेने खाली घालायची वेळ आली.मात्र याची चाड ना लोकप्रतिनिधीना ना अधिकाऱ्यांना!.

पंतप्रधान आवास योजनेत वाढीव दराने निघालेली निविदा,वैद्यकीय विभागातील उघड झालेला भ्रष्टाचार,पाणी पुरवठा विभागातील फसलेल्या योजना,अर्धवट अवस्थेत असलेली घरकुल योजना,पालिका कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेली विमा योजना अशा अनेक योजना व प्रकल्पामधून कोरोडोंचा होत असलेला भ्रष्टाचार संपूर्ण शहर व राज्यातील जनता पाहात आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार वर्तमानपत्रामध्ये व टीव्ही चॅनेल आणि सोशल मीडियावर सतत प्रसारित होत असल्याने पिंपरी चिंचवड शहराचे नाव बदनाम होताना शहराचे कारभारी मात्र का चुडीचुप आहेत? हे न समजणारे आहे!