Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

बापूसाहेब गोरे | पिंपरी |

पिंपरी चिंचवड शहरातील अनेक खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत,हे टाळण्यासाठी यापुढे शहरातील खाजगी रूग्णालयासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनवर पिंपरी महापालिका एका टीमद्वारे “वॉच” ठेवणार असल्याची माहिती ज्येष्ट नगरसेवक व स्थायी समितीचे सदस्य शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांनी “माझा आवाज” ला दिली.

अधिक माहिती देताना श्री शत्रुघ्न उर्फ बापू काटे म्हणाले की “कोरोना आटोक्यात यावा यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे मात्र शहरात कोरोना रुग्ण उपचार घेत असलेल्या अनेक खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा असल्याचे कारण देऊन ऐनवेळी रुग्णांना ” इतर ठिकाणी उपचार घ्या ” असे सांगितल्याने अनेकांचे जीव टांगणीला लागत आहेत.

असाच एक प्रकार नुकताच चिंचवड व चिखली येथील खाजगी रुग्णालयांच्या बाबतीत उघडकीस आला असून त्यांना काही प्रमाणात पिंपरी महापालिकेला शक्य झाल्याने ऑक्सिजन पुरविले आहेत परंतु असे प्रकार पुन्हा पुन्हा शहरात घडू नयेत,यासाठी शहरातील खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्यावर “वॉच” ठेवण्यासाठी काही निवडक अधिकाऱ्यांची टीम तयार करण्यात आली आहे.

खाजगी रुग्णालयांनी स्वतःच्या वापरासाठी आवश्यक लागणारा ऑक्सिजनचा साठा व्यस्थितपणे ठेवावा व रुग्णांची गैरसोय टाळावी, अशाप्रकारच्या सूचना खाजगी देण्यात आल्या असून खाजगी रुग्णालयाच्या ऑक्सिजनच्या तक्रारीबाबत देखरेख महापालिका एका टीमद्वारे करणार असल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिली असल्याचे ज्येष्ट नगरसेवक व स्थायी समितीचे सदस्य श्री शत्रुघ्न(बापू)काटे यांनी सांगितले.