Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

पिंपरी 👉🏻 बापूसाहेब गोरे |

पिंपरी चिंचवड महापालिका,राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून पिंपरी महापालिका शहरातील गरीब कुटुंबासाठी तीन वेगवेगळ्या ठिकाणी पंतप्रधान घरकुल प्रकल्प राबवित असून मागील महिन्यात या प्रकल्पातील घरांचा लक्की ड्रॉ काढण्याच्या कार्यक्रमात भाजपची नाचक्की झाली असून ही नाचक्की पिंपरी महापालिकेच्या ऐका अधिकाऱ्याच्या “उतावीळपणा” मुळेच झाल्याची पालिकेत चर्चा सुरू आहे.

कोर्टाची पुढची तारीख 4 फेब्रुवारी…!

पिंपरी चिंचवड महानगरपालिका बोऱ्हाडेवाडी,चऱ्होली व रावेत या तीन ठिकाणी पंतप्रधान घरकुल बांधत आहे.या तीनपैकी रावेत या प्रकल्पासाठी सर्वात जास्त नागरिकांची पसंती आहे.मात्र नेमकी याच प्रकल्पाच्या जागेवरून कोर्टात वाद आहे.कोर्टाने “रावेत येथील जागेवर कसलेही बांधकाम करू नये”असा आदेश दिलेला आहे.त्याविरुद्ध पिंपरी महापालिका अपिलात गेली असून त्याची सुनावणी येत्या 4 फेब्रुवारीला आहे.त्यावेळेस प्रकल्पाचे भवितव्य समजणार आहे.

उतावीळ” अधिकारी कोण?

पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडूक काही महिन्यावर येऊन ठेपली असल्याने हातातील प्रकल्प पूर्ण करण्याचा भाजपचा प्रयत्न असून त्यापैकीच पंतप्रधान घरकुल हा एक प्रकल्प आहे.
या प्रकल्पातील चऱ्होली व बोऱ्हाडेवाडी या प्रकल्पाचे काम 20 टक्केच झाले असून रावेत प्रकल्प कोर्टात अडकला असून त्याची सुनावणी 12 जानेवारीला होती तरीही पिंपरी महापालिकेतील ऐका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या उतावीळ पणामुळे आम्ही कोर्टाच्या आदेशाची वाट न पाहता 11 जानेवारीला लक्की ड्रॉ काढण्याची घाई केली व कार्यक्रम रद्द करण्याची नामुस्की आल्याचे भाजपचे पदाधिकारी सांगत आहेत.
कोर्टाची 12 जानेवारी 2021 ही तारीख असताना 11 जानेवारी 2021 ला कार्यक्रम घेणे घाई नाही का असे पत्रकारांनी विचारले असता अहो आम्हाला माहीत आहे कोर्टाच्या दाव्यात काही दम नाही निकाल आपल्याच बाजूने मिळणार आहे असा युक्तिवाद सदर अधिकाऱ्याने पत्रकारांना व पदाधिकाऱ्यांना केला व भाजपची शहरात बदनामी झाली.त्यामुळे असा अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.