Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

पिंपरी | बापूसाहेब गोरे |

पंतप्रधान घरकुल योजना सोडत प्रकरणी राज्यात नाचक्की झालेले पिंपरी चिंचवड भाजपचे पदाधिकारी बैचेन झाले असून राजकीय झालेली पीछेहाट भरून काढण्यासाठी येत्या आठवड्यात रद्द झालेला लक्की ड्रॉ चा कार्यक्रम भव्य स्वरूपात घेण्यात येणार असून यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अथवा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या असल्याची माहिती मिळत आहे.

भव्यदिव्य कार्यक्रम होणार?

पिंपरी चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची निर्विवाद सत्ता आहे.तसेच शहरात दोन आमदार आहेत असे असताना राजशिष्टाचाराचे कारण देऊन नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला.पक्षाचे राज्याचे अध्यक्ष यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन परत जावे लागले ही अपमानाची “सल” भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मनात बोचत असून याचा राजकीय वचपा काढण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असून भाजपचा महत्वकांक्षी प्रकल्प पंतप्रधान घरकुल योजनेचा लक्की ड्रॉ हा कार्यक्रम त्याच ठिकाणी महाराष्ट्र भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अथवा भाजपची धडाकेबाज तोफ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा तत्सम मान्यवरांना बोलावून त्यांच्या हस्ते लक्की ड्रॉ चा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात करण्याचा विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.