Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

बापूसाहेब गोरे | पिंपरी |

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती सभापतींच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या दोन्ही आमदारांनी “सेफ गेम” खेळली असून नाव एकाचे व सभापतींची माळ मात्र दुसऱ्याच नगरसेवकाच्या गळ्यात घालुन नगरसेवक काटे व लांडगे राजकारणाची “शिकार” झाले असल्याची चर्चा पिंपरी चिंचवड शहरात सुरू आहे.

पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता येऊन चार वर्षे पूर्ण झाले असून सत्ताधारी भाजपचे अनेक नगरसेवक लाभाच्या पदापासून वंचित आहेत. पिंपरी महापालिकेत महापौर व स्थायी समिती सभापती
ही लाभाची पदे वाटप करताना शहरातील दोन्ही आमदारांनी खूप काळजी घेतली असून भविष्यात राजकीय अडचण निर्माण करणार नाहीत अशा नगरसेवकांनाच पदाचे वाटप केल्याने अनेक ” सक्षम” नगरसेवक लाभाच्या पदापासून वंचित राहिले असून नुकत्याच स्थायी समिती सभापतींच्या निवडणुकीत दोन्ही आमदारांनी “सेफ गेम” खेळली असल्याने नगरसेवक बापू काटे व रवी लांडगे हे राजकारणाचे “शिकार”झाल्याचे बोलले जात आहे.