Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

पिंपरी | बापूसाहेब गोरे |

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कोरोनाच्या नावाखाली होत असलेल्या लुटमारी वरून महानगरपालिका व सत्ताधारी भाजपची बदनाम होत असून स्पर्श हॉस्पिटलचे 3 कोटी 26 लाख हे बिल “झांकी ” है कोरोनाच्या नावाखाली अजून लूटमार होणे बाकी है असे जाणकार बोलत आहेत.

संघटित लुटमारी!

पिंपरी चिंचवड महानगरपालिका एक आदर्श महानगरपालिका म्हणून नावाजली होती.सांस्कृतिक नगरी,नागरिकांना सुख सुविधा देणारी महानगरपालिका म्हणून देशभर गवगवा होता.मात्र याच महानगरपालिकेत विकास कामे व कोरोना सारख्या आजाराचे नाव पुढे करून महापालिकेच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या घाला घालण्याचे काम सत्ताधारी पक्षांसह,विरोधी पक्ष,ठेकेदार व अधिकारी करीत आहेत.

बेशर्मीचे समर्थन!
कोरोना आजारावर जीव धोक्यात घालून नागरिकांचे जीव वाचविण्याचे काम अनेक डॉक्टर,नर्स व आरोग्य कर्मचारी तसेच शहरातील विविध संस्था व संघटनांनी केले.मात्र त्याचा गैरफायदा घेण्याचे काम लोकप्रतिनिधी व महापालिकेचे अधिकारी करीत असून कोरोनाच्या नावाखाली करोडो रुपयांची लूट सुरू आहे.आणि याबाबत विचारणा केल्यास त्या लुटमारीचे समर्थन बेधडक कसलाही विचार न करता आयुक्त श्रावण हार्डीकर व सत्ताधारी लोकप्रतिनिधी करीत आहेत.त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेतील तिजोरीची होणारी लूट जनता उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. आयुक्त श्रावण हार्डीकर व सत्ताधारी भाजपा महापालिकेच्या भल्यासाठी आहेत का ? उधळपट्टी करण्यासाठी आहेत ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

कोरोनाच्या नावाखाली लूट बाकी है!

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी कोरोनाचा एकही पेशन्ट दाखल नसताना स्पर्श हॉस्पिटलचे 3 कोटी 26 लाख रुपयांचे बिल द्यावे असा विषय मागील दोन दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत आणला.स्थायी समितीने हा विषय बिन बोभाट मंजूर केला.त्यामुळे संपूर्ण शहरात चर्चा सुरू झाली आणि बदनामीही.
स्पर्श हॉस्पिटलचे 3कोटी 26 लाख हे बोगस बिल एक ” झांकी है कोरोनाच्या नावाखाली अजून लूटमार होणे बाकी है असे पालिकेतील अनेक जाणकार सांगत आहेत.