Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

पिंपरी | बापूसाहेब गोरे |

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ठेकेदारांचे बोगस एफडीआर प्रकरण शांत होते ना होते तोच 5 बोगस ठेकेदारावर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला अशी खोटी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक,आमदार,पत्रकार व नागरिकांना देऊन एक प्रकारे पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे.

आमदार बनसोडे यांची तक्रार!

पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पिंपरी महापालिकेत अनेक ठेकेदारांनी बोगस एफडीआर सादर केली असल्याची लेखी तक्रार 22 सप्टेंबर रोजी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली होती.

मारुती भापकर यांचे ही पत्र

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी 5 जानेवारी पालिका आयुक्त यांना लेखीपत्र देऊन चौकशी करण्याची व स्थायी समिती बोगस एफडीआर प्रकरणातील 18 ठेकेदारावर मेहरबान असून स्थायी समितीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.

विरोधीपक्ष नेते यांची पत्रकार परिषद

पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी मागील आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन बोगस एफडीआर प्रकरणातील ठेकेदारांना पालिकेचे प्रशासन व सत्ताधारी भाजप पाठीशी घालत असल्याचा आरोप करून दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली.

आयुक्तांचा खोटारडेपणा

बोगस एफडीआर प्रकरण शांत करण्यासाठी आयुक्तांनी पालिका प्रशासनाने
1)मे डीडी कन्स्ट्रक्शन (दिनेश मोहनलाल नवानी)
2) वैदही कन्स्ट्रक्शन (दयानंद जीवन माळगे)
3)मे एस बी सवाई (संजय बबन सवई)
4) मे पाटील अँड असोसिएट (सुजित सूर्यकांत पाटील)व 5)कृती कन्स्ट्रक्शन (विशाल हनुमंत कुराडे)या पाच ठेकेदारावर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली मात्र यासंदर्भात चौकशी केली असता आज दि 15 जानेवारी 2021 दुपारी 12 पर्यंत पोलीस स्टेशनमध्ये पिंपरी महापालिकेच्या बोगस एफडीआर प्रकरणी एकाही ठेकेदारावर लेखी स्वरूपात गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात येते.

याप्रकरणी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये केवळ एक माहिती (बोगस एफडीआर बाबत जुजबी माहिती)दिली असून पोलीस विभागाकडून पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनास दोन वेळा निरोप पाठविण्यात आला असून पिंपरी महापालिकेचा एखादा अधिकारी अथवा कर्मचारी पाठवून रीतसर गुन्हा दाखल करावा असे सांगूनही आज तागायत पिंपरी महापालिकेचे पोलिसांकडे कोणीही तिकडे फिरकले नसून बोगस एफडीआर प्रकरण शांत करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.