Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

बापूसाहेब गोरे | पिंपरी |

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील आर्थिक दुर्लब घटकांसाठी राबविण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेत ज्यांना घरे मिळाले नाहीत त्यांची अनामत रक्कम त्वरित परत मिळावी अशी मागणी भारतीय राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

केंद्र सरकार,राज्य सरकार व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील दुर्लब घटकांसाठी चऱ्होली,रावेत व बोऱ्हाडेवाडी येथे अल्पदरात गृहप्रकल्प उभारण्याचे ठरले.महापालिकेच्या या योजनेसाठी मागील वर्षी 17 ऑगस्ट ते 10 ऑक्टोबर दरम्यान नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले.योजनेसाठी ४७ हजार ८७८ अर्ज दाखल झाले त्यापैकी ४७ हजार ७०७ पात्र ठरले.या अर्जाची छाननी करून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात योजनेतील पात्र- अपात्र अर्जदारांची यादी जाहीर करण्यात आली.

पात्र ४७ हजार ७०७ अर्जदारांची सोडत मागील महिन्यात काढण्यात आली.
गृहप्रकल्पातील घरे मिळावीत यासाठी एकूण ४७ हजार ८७८ पैकी केवळ ३ हजार ६६४ घरे मिळणार असून ४४ हजार २१४ नागरिक योजनेपासून वंचित राहणार आहेत.

२२ कोटी १०लाख पैसे पडून!

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अहवानानुसार नागरिकांनी प्रत्येकी ५ हजार रुपये मागील वर्षी अनामत रक्कम म्हणून भरलेली आहे.पंतप्रधान आवास योजनेत ज्यांना घरे मिळणार नाहीत त्या नागरिकांची अनामत रक्कम म्हणून सुमारे २२कोटी १० लाख ७० हजार रुपये महापालिकेकडे अडकुन पडले असून ते पैसे काहींनी उसने तर काहींनी व्याजाने आणलेली आहेत. तरी ते अनामत रक्कमचे नागरिकांचे पैसे लॉकडाऊन सुरू करण्याच्या अगोदर परत करावीत अशी मागणी भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे प्रसिद्धी प्रमुख अजित संचेती यांनी एका निवेदनाद्वारे आयुक्त राजेश पाटील यांना केले आहे.