Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

बापूसाहेब गोरे | पिंपरी |

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला असून शहरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरकुलच्या योजनेसाठी घेतलेली अनामत22 कोटी 10 लाख रुपये ही रक्कम (ज्या नागरिकांचा ड्रॉ मध्ये नंबर नाही अशांना)येत्या सोमवार पासून प्रत्येक अर्जदाराच्या बँकेत ट्रान्सफर केली जाणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी मागील वर्षी 17 ऑगस्ट ते 10 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन अर्ज मागविले होते व त्या अर्जासोबत 5 हजार रूपाचा डीडी जमा करण्यास सांगितले होते. घरकुल साठी 47 हजार 878 एवढे अर्ज आले त्यापैकी 3हजार 664 अर्ज पात्र केले.
अपात्र केलेल्या नागरिकांची संख्या 44 हजार 214 एवढी असून त्यांचे 5 हजार प्रमाणे अनामत रक्कम 22 कोटी 10 लाख होते.हे नागरिकांचे पैसे पालिकेकडे पडून होते.
मागील आठवड्यात यासंदर्भात भारतीय राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने आयुक्तांना लेखी पत्र देण्यात आले व सदरील बातमी माझा आवाज ने ठळक स्वरूपात प्रकाशित केली होती.

महापौर ढोरे यांची घोषणा!

पंतप्रधान आवास योजनेतील अपात्र नागरिकांची अनामत रक्कम बाबत माझा आवाज च्या प्रतिनिधीने पाठपुरावा केला असता महापौर माई ढोरे यांनी उत्तर दिले असून जे नागरिक अपात्र ठरले आहेत व ज्यांचे नंबर ड्रॉमध्ये लागला नाही अश्या सर्व अर्जदारांचे पैसे येत्या सोमवारी दि 6 एप्रिल पासून त्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यात येणार असल्याची माहिती माई ढोरे यांनी दिली. आहे.