Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

पिंपरी(प्रतिनिधी)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारतीमध्ये साफ सफाई काम करणारे कंत्राटदार “तावरे फॅसिलिटी “च्या कामगाराने पाणी पिण्याच्या बाटलीत ऍसिड ठेवून कामात कुचराई केली त्यामुळे त्या ठेकेदारास काळ्या यादीत टाका अशी मागणी नगरसेवक उत्तम केंदळे व राजू बनसोडे यांनी पिंपरी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा सभापती कार्यालयातील मिटिंग रूममध्ये साफ सफाई कर्मचाऱ्याने निष्काळजीपणे पाणी पिण्याच्या बॉटलमध्ये पाणी ऐवजी ऍसिड ठेवले व हे ऍसिड नगरसेवक राजू बनसोडे यांच्या कार्यकर्त्याने पाणी समजून पिल्याने त्यास उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी व त्यांचे नाव काळ्या यादीत दाखल करावे अशी मागणी दोन्ही नगरसेवकांनी पिंपरी महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.