Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

पिंपरी | बापूसाहेब गोरे |

आशिया खंडात श्रीमंतीने नावाजलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेची आर्थिक स्थिती पूर्वीसारखी राहिली नसून पालिकेतील खाऊगिरी,वाढलेला भ्रष्टाचार व प्रशासकीय अनागोंदी कारभार यामुळे महापालिकेचे नाव मागे पडले आहे.मलईदार खात्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले काही “वतनदार” अधिकारी शहराच्या विकासाला “खीळ” घालत असून पिंपरी महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील हे या निगरगट्ट वतनदार अधिकाऱ्यांना कधी “हलवणार” अशी विचारणा होत आहे.

शासकीय अधिकारी, कर्मचारी एका विभागात तीन वर्षे काम करू शकतो त्यानंतर त्या अधिकाऱ्याचे ठेकेदाराशी लागेबांधे निर्माण होऊ शकतात व इतरांना त्याठिकाणी काम करण्याची संधी मिळावी यासाठी तीन वर्षे पूर्ण झालेल्या अधिकारी,कर्मचाऱ्याची इतर विभागात बदली केली जाते मात्र पिंपरी महापालिकेत अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात सलग आठ-आठ वर्षे काम करतात.याचे उदाहरण म्हणजे पिंपरी महापालिकेच्या बीआरटी या विभागात एक अधिकारी त्याच्या “समाजाच्या” ऐका राजकीय व्यक्तीची भीती दाखवून आठ वर्षे बीआरटीमध्ये “ठाण मांडून”बसला आहे.
सदरील अधिकारी नेहमी “मलईदार” विभागात काम करण्यासाठी इच्छुक असतो.आर्थिक देवाण-घेवाण यामध्ये तरबेज असणारा हा अधिकारी ” लोकप्रतिनिधी व इतरांना नेहमी आर्थिक खुश ठेवतो मात्र त्यासाठी महापालिकेच्या विकास कामामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करत असून शहराच्या विकासामध्ये बाधा येत असल्याची चर्चा पालिकेत सुरु आहे.

आयुक्त राजेश पाटील यांना आव्हान!

सदरील अधिकारी एवढा मस्तवाल झाला आहे की “माझी बदली या विभागातून करून तर दाखवा,मग तुम्हाला मानतो” असे खुले आवाहन देतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा शिस्तबद्ध कारभार करू पाहणाऱ्या आयुक्त राजेश पाटील यानांही या “वतनदार ” अधिकाऱ्याचे आव्हान असणार आहे. बीआरटी विभागाच्या कारभाराबद्दल नगरसेवकांमध्ये नेहमीच उलट सुलट चर्चा सुरू असते.सदरील “वतनदार”अधिकारी महिन्याला अनेकांना लाखो रुपये वाटप करत असून एवढे पैसे कोठून आणतो अशी चर्चा पालिकेत सुरू आहे.

माझ्या कॅबिनला नगरसेवक पडून असतात?

प्रभागातील विकास कामाबाबत नगरसेवक अनेकवेळा अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कॅबिनला जातात मात्र काही अधिकाऱ्यांना त्याचा गर्व होतो. सत्ता व अमाप भ्रष्टाचार करून जमविलेल्या पैश्यामुळे “वतनदार” बनलेला अधिकारी सर्वांना सांगतो ” माझ्या कॅबिनला अनेक भले- भले नगरसेवक पडून असतात त्यामुळे मला काही फरक पडत नाही” अशी उर्मट भाषा अधिकाऱ्यांकडून येणे नावाजलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला “भूषणावह” नाही.

मेंटन्सच्या नावाखाली लूटमार!

महापालिकेच्या अनेक विभागात राजरोसपणे भ्रष्टाचार केला जात असून काही विभागाच्या भ्रष्टाचाराबद्दल उघडपणे चर्चा केली जाते. त्यापैकीच बीआरटी या विभागात मेंटन्सच्या नावाखाली काढली जाणारे लाखो रुपयांची बोगस बिले,मेंटेनन्सचे काम एकच मात्र त्याचे वेगवेगळी चार चार बिले काढून भ्रष्टाचार काढत असल्याची चर्चा सुरू आहे.

झकास प्रेझेंटेशन भकास कामगिरी!

महापालिकेतील अनेक अधिकारी पैसे लाटण्याचा नवनवीन क्लुप्त्या काढुन पालिकेची तिजोरी खाली करण्याचे काम करीत असून नवीन प्रोजेक्ट्सचे नगरसेवक व लोकप्रतिनिधीना झकास प्रझेन्टेशन दाखविले जाते त्यासाठी करोडो रुपये मंजूर केले जातात व ज्यावेळी ते काम पूर्णत्वास जाते त्यावेळी त्याचा दर्जा भकास असल्याचेही सांगितले जाते.

पिंपरी चिंचवड शहरातील सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधीचे महापालिका कारभारावर दुर्लक्ष, बोकाळलेला भ्रष्टाचार, प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि वतनदार अधिकाऱ्यांची चलती यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विकास कामावर विपरीत परिणाम होत यावर वेळीच आवर घातला नाही तर नावाजलेल्या महापालिकेचा कारभार “भकास” होण्यास वेळ लागणार नाही.

पालिका प्रशासनाची डोळेझाक!
काही “वतनदार” अधिकारी

१) विजय ज्ञानदेव भोजने
विभाग-(बीआरटी)-7 वर्षे 9 महिने
२)पाटील दीपक ज्ञानेश्वर
विभाग-(बीआरटी)-7 वर्षे
3)शिंदे सुनील गंगाराम-विभाग-(नगररचना)-8 वर्षे 1 महिना
4) खडतरे संदेश शामसुंदर-विभाग-(नगररचना)-7 वर्षे 1 महिना
5)जगताप राजेश बाबुराव-विभाग-(नगररचना)-7 वर्षे
6)तावरे संजय मल्हारी -विभाग(नगररचना)-4वर्षे 5 महिने