Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

| बापूसाहेब गोरे | पिंपरी |

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी गेली अनेक वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असणाऱ्या वतनदार कर्मचारी,अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यास सुरुवात केली असून आज त्यांनी महापालिकेच्या नगररचना, पाणी पुरवठा, बांधकाम विभाग व बीआरटी अश्या 27 उपभियंत्याना “दणका”दिला असून त्यांच्या इतर विभागात बदल्या करण्याचे आदेश दिले असून एक दिवसात बदली झालेल्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश पत्रात नमूद करण्यात आले आहेत.

साप्ताहिक समाज गर्जनाच्या बातमीची घेतली दखल!

साप्ताहिक समाज गर्जनाच्या मागील दोन अंकात महापालिकेच्या विविध विभागात वर्षानुवर्षे “वतनदार” बनून बसलेले अधिकारी बदलावेत अशी बातमी प्रकाशित केली त्याची दखल आयुक्त राजेश पाटील यांनी घेतली असून मागील आठवड्यात 18 लिफ्टमनच्या व आज 27 उपभियंत्याच्या बदल्या करण्यात आल्या.आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.