Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

पिंपरी -(प्रतिनिधी)
कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णालयातील रुग्णांना चढ्या दराने रेमडेसिविर इंजेक्शन विकणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील आदित्य बिर्ला,लोकमान्य हॉस्पिटल व डी वाय पाटील कॉलेज या तीन रुग्णालयांवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी कारवाईचा “बडगा” उगारला असून कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.

सध्याच्या परिस्थितीत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना शहरातील मोठे रुग्णालये रेमडेसिविर इंजेक्शन महागात विकत असल्याचे निदर्शनास आल्याने साथरोग अधिनियम 1897 आणि आपत्कालीन व्यवस्थापन 2005 अंतर्गत आपणावर का कारवाई करू नये ? अशा प्रकारच्या नोटीस काल सांयकाळी तिन्ही रुग्णालयांना पाठविल्या असून 48 तासात खुलासा करण्यास सांगितले आहे.