Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

पिंपरी-प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण बरखास्त झाल्याने त्यांचे एक हजार कोटींचे नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले आहे मात्र हेच भाजपचे पुढारी कोरोनाच्या काळात एकत्र कसे आले नाहीत असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत विचारला आहे.

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण महाआघाडी सरकारने बसखास्त केले याबाबत काल पिंपरी चिंचवड भाजपच्या वतिने आमदार लक्ष्मण जगताप,आमदार महेशदादा लांडगे,महापौर माई ढोरे इत्यादी पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन प्राधिकरण बरखास्त निर्णयाविरुद्ध अनेक आरोप करण्यात आले होते.

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरी महापलिकेतील विरोधीपक्ष कार्यालयात माजी आमदार विलास लांडे,शहराध्यक्ष संजोग वाघिरे,विरोधीपक्ष नेते राजू मिसाळ,नगरसेवक अजित गव्हाणे,मंगलाताई कदम,वैशाली काळभोर,राजू बनसोडे,भाऊसाहेब भोईर या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोपाचे खंडन केले.
यावेळी बोलताना भाजपच्या दोन्ही आमदारांवर आरोप करताना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे म्हणाले पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाने अनेक नागरिक मृत्युमुखी पडत असताना हे भाजपचे हे स्थानिक नेते एकत्र आले नाहीत आता प्राधिकरण बरखास्त केल्याने भाजपच्या नेत्यांचे धंदे बंद होत आहेत त्यामुळे एकत्र येऊन असे चुकीचे आरोप करीत आहेत.