Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

बापूसाहेब गोरे | पिंपरी |

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा वाढता प्रकोप व रुग्णालयावर येत असलेला ताण लक्षात घेता पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहरात भोसरी येथे दुसरे “जम्बो कोविड सेंटर” उभा करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांच्या पुढाकाराने महापौर निधीतून दोन ऍम्ब्युलन्स व एक रक्तपेढीसाठी कार्डियक बसच्या लोकार्पण सोहळा आज पिंपरी महापालिका मुख्य इमारतीच्या आवारात पार पडला यावेळी आमदार महेशदादा लांडगे पिंपरी महापालिकेत आले. यावेळी आमदार महेशदादा यांनी आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली व भोसरी येथे दुसरे “जम्बो कोविड सेंटर” उभारणी बाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व कोरोनामुळे रुग्ण मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे दुसरे “जम्बो कोविड सेंटर” उभारण्याचे विचाराधीन असल्याचे बोलले जाते.