Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

पिंपरी-प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात जलपर्णी न काढल्याने डासांचे प्रमाण वाढले असून त्यास कारणीभूत असणारे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल रॉय यांची हकालपट्टी करा अशी मागणी महापौर माई ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी आज पालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

आज सांयकाळी साडेपाच वाजता महापौर माई ढोरे यांच्या दालनात पत्रकार परिषद घेण्यात आली.यावेळी उपमहापौर हिराबाई घुले या उपस्थित होत्या.

यावेळी ढाके पुढे म्हणाले की शहरात जलपर्णी काढण्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती केली असली तर तो ठेकेदार काम करण्यासाठी टाळाटाळ करीत असून त्यास भ्रष्टाचाराने बदनाम झालेले आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल रॉय पाठीशी घालत आहेत.अनेक नगरसेवकांनी तक्रारी आल्याने आज सकाळी महापौर माई ढोरे,पक्षनेते नामदेव ढाके ,उपमहापौर हिराबाई घुले इत्यादी पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यासंदर्भात आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली असल्याचे महापौर माई ढोरे आणि नामदेव ढाके यांनी सांगितले.