Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

पिंपरी | बापूसाहेब गोरे |

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर आज सकाळी 11.30 वाजता पिंपरी महापालिकेत आठ दिवसाच्या सुट्टीनंतर पुन्हा रुजू झाले आहेत.

श्री श्रावण हार्डीकर यांची पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून तीन वर्षे कार्यकाल संपला असून केव्हाही त्यांची बदली होऊ शकते.मागील आठवड्यात हार्डीकर आठ दिवसाच्या सुट्टीवर गेले होते.त्यावेळी आयुक्त श्रावण हार्डीकर यांचे प्रमोशन झाले असून त्यांच्या ठिकाणी रुबल अगरवाल,अजित पवार, राजेश पाटील,सुहास दिवसे इत्यादींची नावे चर्चिला आली होती.
दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ट पदाधिकारी आयुक्त श्रावण हार्डीकर हे सुट्टी संपल्यानंतर आयुक्त म्हणून रुजू होणार व फेब्रुवारी व मार्चचा पहिला आठवड्यापर्यंत आयुक्त म्हणून तेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे कामकाज पाहणार असे ठामपणे सांगत आहेत.

प्रसार माध्यमातून आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याविषयी अनेकवेळा बातम्या प्रकाशित झाल्या मात्र आयुक्त श्रावण हार्डीकर यांची बदली होऊ शकली नाही किंवा कोणी केलीही नाही.

त्यामुळे काहीही झाले तरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदी श्रावण हर्डीकर हे आणखी एक महिना काम करणार हे नक्की आहे.