Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

बापूसाहेब गोरे | पिंपरी |

कोरोनाच्या प्रदूर्भावाने शहरातील छोटे व्यवसायिक व मोलमजुरी करणारे नागरिक यांना आर्थिक हातभार लागावा या उद्देशाने व येणारे वर्ष हे निवडणूकीचे वर्ष असल्याने सत्ताधारी भाजपने प्रत्येकी 3 हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळावे यासाठीच्या योजनेला मूर्तस्वरूप मिळावे यासाठी आज दुपारी 2 वाजता महानगरपालिकेची सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे.

आजच्या विशेष सर्वसाधारण सभेत शहरातील परवानाधारक रिक्षा चालक,पथविक्रेते, चर्मकार व्यवसायिक,नाभिक व्यवसायिक,शालेय विद्यार्थी वाहतूक वाहन चालक, जिम व्यवसायिक,लोककलावंत,घरेलू कामगार,बांधकाम मजूर,बँड पथक यावर्गात समाविष्ट असणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार असून याबाबतचा निर्णय आजच्या सर्वसाधारण सभेत होणार असून विषय मंजूर झाल्यास शहरातील सुमारे 40 हजार नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.