Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

बापूसाहेब गोरे | पिंपरी |

पिंपरी चिंचवड शहरात जे नागरिक पाळीव कुत्रे सांभाळतात त्यांना पिंपरी चिंचवड महापालिका पाच हजार रुपये दंड आकारणार आहे कारण ही तसेच आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे जीवनमान सुधारावे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रयत्नशील असते मात्र शहरातील काही नागरिक कुत्रे पाळतात घरामध्ये आणि त्या कुत्र्यांना शौचास आणतात सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर त्यामुळे परिसराचे सार्वजनिक स्वास्थ्य बिघडते.
या प्रकारच्या तक्रारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागातून पिंपरी चिंचवड महापालिका कार्यालयास व अनेक नगरसेवकांना आल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंदाजपत्रक 2021 -2022 यावर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक बोलावण्यात आली. याबैठकीत अनेक नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्राधिकरणातील नगरसेवक व पिंपरी महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी पाळीव कुत्रे यांच्या पासून नागरिकांना होणारा त्रास याबाबत महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील व महापौर माई ढोरे यांच्याकडे तक्रार केली असून जे नागरिक पाळीव कुत्रे शौचास सार्वजनिक ठिकाणी आणतील त्यांना पाच हजार रुपये दंड आकारावा असे आग्रहाने सांगितले आहे.
त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
नागरिकांनी कुत्रे पाळावीत परंतु त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होऊ नये हीच भावना त्यामागील आहे.

त्यामुळे पाळीव कुत्रे पाळणारे नागरिक हो सावधान अन्यथा पाच हजार रुपये तयार ठेवा.