Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

पिंपरी | प्रतिनिधी |

आशिया खंडात प्रसिध्द असणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मुख्य प्रशासकीय इमारतीची सुरक्षा “राम भरोसे झाली असून इमारतीच्या प्रवेशद्वारावरील “बॅग तपासणी मशीन तब्बल चार महिन्यापासून बंद असून महापालिका प्रशासन मोठी अघटित घटना घडण्याची वाट पाहत आहे काय ? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पिंपरी येथे मुख्य प्रशासकीय चार मजली इमारत असून विविध कामासाठी दररोज शहरातील ,नगरसेवक,पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार इत्यादी दररोज हजारो नागरिक येत असतात. इमारतीमध्ये प्रवेश करताना कोणासही आडकाठी केली जात नाही.कोणीही व्यक्ती इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत सहज प्रवेश करू शकतो.अशावेळी कसलीही अघटित घटना घडू शकते. ही शहराच्या दृष्टीने भयावह ठरू शकते.

इमारतीची सुरक्षा राहावी यासाठी दोन वर्षापूर्वी इमारतीच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारात “बॅग तपासणी मशीन “बसविण्यात आली.ती मशीन एका कर्मचाऱ्याद्वारे चालविण्यात आली मात्र गेली चार महिन्यापासून ही मशीन बंद असून “कोण व्यक्ती काय घेऊन येतो याची कोणासही कल्पना येत नाही त्यामुळे प्रशासनाने याबाबत त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे.