Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

पुणे-(प्रतिनिधी)
चार वर्षापासून  पि सी आय कामगारांना  पगारवाढ झालेली नाही. व्यवस्थापन सतत टाळाटाळ करत आहे.  युनियनकडून सतत सकारात्मक दृष्टीकोनातून चर्चा होत असताना कंपनीने मात्र वेळोवेळी नकारात्मक भूमिका घेऊन नेहमीच कामगारांची पिळवणूक करत आलेली आहे. कंपनीने पगारवाढ करण्याऐवजी साप्ताहिक सुट्टीत बदल करणे , गैरहजेरी  लावणे , बिनपगारी सुट्टी  लावणे , मेमो देणे , काढून टाकण्याचे पत्र देने, अशा गोष्टीवर कंपनीने जोर दिला. कामगार  ऑफिसमध्ये शांततेच्या मार्गाने अशा गोष्टींवर निषेध नोंदवत असताना मुंबईतील काही शाखा  मध्ये कंपनीने कामगारांचे खच्चीकरण करण्यासाठी बाउन्सर बोलवले. पगारवाढीची केस कोर्टात प्रलंबित असताना , सर्व कामे सुरळीत चालू असताना कंपनीने वेळोवेळी आडमुठेपणाची भूमिका घेऊन कोर्टाचा अपमानच नाही तर सर्व कामगारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.  कोरोना काळात सर्व कामगारांनी अत्यावश्यक सेवेत नसताना आपल्या जीवाची पर्वा न करता, कंपनीची कामे कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाहीत याची दखल घेऊन ग्राहकांना सेवा पुरवली परंतु याचाही कंपनीने विचार केला नाही. कंपनी एकीकडे म्हणतेय की  कामगार हा पाया आहे मग पगारवाढ करताना , यांना मानसिक त्रास देताना याचा विचार का केला जात नाही ?  जर कामगार आनंदाने कामावर गेला तर तेवढ्याच  जोमाने काम करू शकतो पण त्याच कामगारांच मानसिक खच्चीकरण होत असेल तर तो तरी कसा मन प्रसन्न , आनंदी ठेऊन काम करू शकनार ? असे कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त करत काम बंद आंदोलन केले  महाराष्ट्र पिसिआय यूनियन नी पगारवाढ झाल्याशिवाय काम चालू करणार नसल्याचे सांगितले यावेळी अध्यक्ष अंकुश गुरव , संतोष धाकतोडे , अजित गुरव , सतिश शेलार , विजय गायकवाड व पि सी आय कामगार संघटना चे सर्व सभासद उपस्थित होते

पिसीआय कामगारावर होणाऱ्या अन्याय  सोडवण्या ऐवजी बॉउन्सर पाठवले कामगारांना दम देण्यासाठी  यावर कामगार मंत्री , उपमुख्यंत्री अजित पवार व मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी लक्ष घालावे अशी मागणी कामगारानी केली आहे